

anushree mane
esakal
आपल्या हटके रील्स आणि व्हिडिओंमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय रील स्टार अनुश्री माने काही महिन्यांपूर्वी 'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसली होती. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आता तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांनीदेखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अनुश्रीने स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलंय. आणि या घराच्या पूजेचा एक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केलाय. तिने भावुक पोस्ट करत आपल्या वडिलांची आठवण काढली आहे.