

JAHNAVI KILLEKAR.
ESAKAL
छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार गेल्या काही वर्षात व्यवसायाकडे वळले. कुणी स्वतःचं हॉटेल सुरू केलं तर कुणी स्वतःचा ब्रँड सुरू केला. ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांनी स्वत:चा क्लोदिंग ब्रँड सुरू केलेला आहे. त्याचबरोबर अक्षया देवधर, अमृता खालविलकर, प्राजक्ता माळी यांनीही स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड सुरू केलाय. त्याचबरोबर माधवी निमकर, समीर खांडेकर, प्रसाद लिमये, ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे व अनघा अतुल यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केलाय. आता त्यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडलीये. लोकप्रिय मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय.