.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
घायाळ करणारं सौंदर्य, अदाकारी आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्व असलेल्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर सध्या बिग बॉस मराठी या रिएलिटी शोमधून चर्चेत आल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर सध्या सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहेत. या कार्यक्रमातून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विविध चित्रपट आणि मालिकांमधून वर्षा यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. लोकप्रिय पौराणिक मालिका 'महाभारत' मध्येही वर्षा उसगांवकर यांनी काम केलय. 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत विविध महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अनेक कलाकारांना या मालिकेतून लोकप्रियता आणि ओळख मिळाली आहे. याच मालिकेत वर्षा उसगांवकर यांनी साकारलेली भूमिका देखील लक्षवेधी ठरली होती.