हेअरस्टायलिस्ट आणि फिटनेस फ्रिक ओंकार राउत 'बिग बॉसच्या घरात आला आहे. .छोट्या पडद्यावरील बिरबलची म्हणजेच हिंदी अभिनेता विशाल कोटियन याची 'बिग बॉस मराठी ६'मध्ये एंट्री झालीये. .प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील सोशल मीडियावर चर्चेत असते. आता नृत्य विश्व गाजवल्यानंतर 'बिग बॉस मराठी 6'मध्ये ती धुमाकूळ घालताना दिसेल. .जुन्नर तालुक्यातील विदयार्थी अध्यक्षा दिव्या शिंदेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री .अमरावतीचा बिल्डर रोशन भजनकर याची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री झाली आहे. .'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापट आता 'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसणार आहे. .रोडीज असो वा नृत्याचा मंच, प्रत्येक ठिकाणी आपली छाप पाडणारी महाराष्ट्राची वाघीण रुचिता जामदार बिग बॉस मराठीच्या घरात धुमशान घालायला सज्ज आहे...आपल्या रिल्समधून प्रेक्षकांना वेड लावणारी इन्फ्लुएन्सर अनुश्री माने आता 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आली .'बिग बॉस मराठी ६' च्या घरात लोकप्रिय गायिका प्राजक्ता शुक्रे हिची एंट्री झाली आहे. .'बिग बॉस मराठी ६' च्या घरात मराठवाड्याचा छोटा डॉन प्रभू शेळके याची एंट्री झाली आहे..लोकप्रिय कंटेंट क्रिएटर, स्टँड-अप कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनवणे 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला आहे. 'फोकस्ड इंडियन' म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. .छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेता आयुष संजीव याची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री झालीये. त्याच्यासोबत अभिनेत्री तन्वी कोलते आहे. .'द एक्सपोज','ग्रेट ग्रँड मस्ती' या चित्रपटांत काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली राऊत 'बिग बॉसच्या घरात आली आहे. .लोकप्रिय खान्देशी गायक सचिन कुमावतने 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री केली आहे. त्याला पाहून खान्देशी प्रेक्षक भलतेच खुश झालेत. आता 'बिग बॉस मराठी ६' च्या प्रेक्षकांमध्ये खान्देशी प्रेक्षकांचीही वाढ झालीये. . 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे आता 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व गाजवायला सज्ज आहे..मराठमोळी अभिनेत्री आणि आता राजकारणी असलेली दीपाली सय्यद 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसतेय. या वेळेस जाळ आणि धूर सोबतच निघणार असं दिसतंय. दीपालीला पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. .लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुखने दणक्यात 'बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. .सतीश राजवाडे म्हणाले की,"बिग बॉस गेल्यावर्षी जेवढा वेळ प्रसारित केलं जायचं तेवढाच वेळ यावर्षी सुद्धा दाखवलं जाईल. पण यंदा शो रात्री आठ वाजता प्रसारित करण्याचं कारण सुद्धा असंच आहे की, लोकांना शो लवकर पाहता यावा. कधीही प्रेक्षकांना असं वाटायला नको की अरे मला आज बघता येणार नाही. लवकर झोपायचंय उशीर होतोय वगैरे म्हणून लवकर प्रसारणाची वेळ निश्चित केलीये. पहिल्या दिवसापासून शेवट्पर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन होईल याच दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे.".'बिग बॉस मराठी ६' च्या प्रिमिअरच्या आधी काही सदस्यांची नावं समोर आली आहेत. जे 'बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत,. ते पुढीलप्रमाणे करण सोनवणे , सागर कारंडे, आयुष संजीव, सोनाली राऊत, राधा पाटील, दीपाली सय्यद .तरुणीला इन्फ्लुएन्स करणारी लोकप्रिय स्टार 'बिग बॉसच्या घरात येणार आहे. ती म्हणजे अनुश्री माने. .मातीत राबून सोनं पिकवणारा ‘तो’, आता बिग बॉस मराठीच्या घरातील टास्क जिंकण्यासाठी सज्ज आहे! कोण आहे हा सदस्य? .'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन १०० दिवस असणार आहे असं 'बिग बॉस मराठी ६' चे क्रिएटिव्ह हेड सतीश राजवाडे यांनी सांगितलं आहे. .लोकप्रिय खान्देशी गायक आता 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री करणार असल्याचं बोललं जातंय. हा गायक म्हणजे सचिन कुमावत. .'बिग बॉस मराठी ६' सुरू व्हायला अवघे काही तास उरले आहेत. हा भव्य कार्यक्रम तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकाल. हा कार्यक्रम रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. .या नव्या पर्वासाठी बिग बॉस'चं घर पूर्णपणे सज्ज झाले असून, या सीझनचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. यंदा असंख्य दरवाजे पाहायला मिळत आहे. घराच्या भिंती, जमीन आणि इतरत्र सर्वच ठिकाणी दरवाज्यांचे डिझाइन पाहायला मिळाले. त्यामुळे घरात एकूण किती दरवाजे आहेत, हे मोजणं जरा कठीणच आहे. लर्स मराठी आणि बिग बॉस मराठीच्या अधिकृत पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'बिग बॉस मराठीच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लपलेला आहे एक ट्वीस्ट... पाहायला मिळणार धमाल मनोरंजन, इमोशन्स आणि कल्ल्याचा परफेक्ट मिक्स! बिग बॉस मराठीच्या आलिशान घराचा असा आहे फर्स्ट लूक!'.लवकरच 'बिग बॉस मराठी ६' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरलेत. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यावेळेसही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. यावेळेस घरात कोण कोण येणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत. यावेळेस इन्फ्लुएन्सरपासून राजकारण्यांपर्यंत सगळेच यावेळेस एकमेकांवर भारी पडणार आहेत. त्यापूर्वी 'बिग बॉस मराठी ६' च्या घरावर एक नजर टाकूया. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.