

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ चा कालचा म्हणजे २ ० ऑगस्टचा एपिसोड वादग्रस्त ठरला. जान्हवीने पॅडी कांबळे यांचा ओव्हर ऍक्टिंग करता असा अपमान केला. निक्की तांबोळीने पॅडी यांना जोकर म्हंटलं. यामुळे जान्हवीवर सगळीकडून टीका होतेय. यावर आता जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं.