

suraj chavan
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता ठरलेला सुरज चव्हाण घराघरात लोकप्रिय झाला. त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं होतं. त्यानंतर बिग बॉसच्या घरात सुरजने त्याच्या वागणुकीनेदेखील सगळ्यांची मनं जिंकली. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला. त्यात त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधून देण्याचं वचन दिलेलं. आता सुरजचं घर बांधून तयार आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या नव्या घरातच त्याच्या पत्नीचा गृहप्रवेश होणार आहे. आता सुरजच्या लग्नाची तारीख समोर आलीये.