बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री बिपाशा बसू हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या सौदर्यांचे लाखो चाहते आहेत. नेहमीच फिट राहणारी बिपाशा सध्या मातृत्व अनुभवत आहे. तिने देवी नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिच्या जन्मानंतर तिच्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल झालेत. तिचं वजन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी जिमच्या बाहेरचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओनंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगवर बिपाशाने आता सडेतोड उत्तर दिलं आहे.