नादाला लागण्याआधी या वाचून इतिहास आमचा, मग तुमची उदबत्ती पेटवा; पडळकरांनी अभिनय केलेलं गाणं रिलीज, VIDEO VIRAL

MLA Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं आमच्या नादाला लागण्याआधी हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झालं असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Padalkar Acts In Hard Hitting Marathi Song Released On YouTube

Padalkar Acts In Hard Hitting Marathi Song Released On YouTube

Esakal

Updated on

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त आणि आक्रमक विधानांमुळे सतत चर्चेत असतात. याशिवाय गोपीचंद पडळकर यांनी चित्रपटसृष्टीतही काम केलंय. त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली असून अभिनयही केलाय. आता त्यांचं एक नवं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यातून होळकरशाहीचा इतिहास एकदा आठवा असं म्हणत पडळकरांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com