

nagraj manjule old scene in bokya satbande movie
esakal
आता प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या व्यक्तींना शून्यातूनच सुरुवात करावी लागली आहे. असेच काही मराठी कलाकार जुन्या चित्रपटात दिसतात ज्यांनी सहाय्यक भूमिका साकारत आपल्या करिअरची सुरुवात केली. प्रत्येकालाच थेट मुख्य भूमिकेसाठी विचारणा झालेली नाही. बॉलिवूडमध्ये शाहिद कपूर ते मराठी इंडस्ट्रीमधील आदेश बांदेकरांपर्यंत अनेकांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ही छोट्या पात्रांपासूनच केलीये. आता अशाच एका कलाकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो आज खूप मोठा अभिनेता, दिग्दर्शक आहे मात्र त्या सिनेमात तो ओळखूही येत नाहीये.