

bol bol rani trailer
esakal
प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करणारा आगामी मराठी चित्रपट ‘बोल बोल राणी’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये वाढणारा थरार, वेगवान घडामोडी आणि प्रत्येक क्षणात अधिक गडद होत जाणारं रहस्य यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडतो. अपहरण, खून, संशय आणि एकामागून एक उलगडत जाणारी रहस्य प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.