ANUPAM KHER MAHESH BHATT VIDEO
esakal
ANUPAM KHER MAHESH BHATT VIRAL VIDEO: बॉलिवूडमध्ये काही कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतात, तर काही दिग्दर्शक आपल्या कल्पकतेतून अविस्मरणीय कलाकृती घडवतात. अभिनेते अनुपम खेर आणि दिग्दर्शक महेश भट्ट ही त्यापैकीच दोन प्रसिद्ध नावं. एक जण पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडतो, तर दुसरा पडद्यामागे राहून कथा आणि व्यक्तिरेखांमधून जादू निर्माण करताय. दरम्यान अशातच एका कार्यक्रमात दोघेही एकत्र पहायला मिळाले. तिथं मंचावर फोटोशूट सुरु असताना अचानक असं काहीतरी घडलं की, अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना सर्वांसमोर 'तुम्ही इथून निघून जा' असं म्हटलं. त्यांचं बोलणं ऐकताच रागारागात महेश भट्ट तिथून निघून गेले. परंतु त्यांच्यात असं काय घडलं? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे.