

TANYA PURI
ESAKAL
सोशल मीडियावर सेलिब्रिटी जे दाखवतात ते बऱ्याच प्रमाणात खोटं असतं. त्यांचं चाहत्यांसमोरचं वागणं वेगळं असतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते अतिशय वेगळे वागतात, वेगळे राहतात. त्यात कलाकारांच्या विवाहबाह्य संबंधांची देखील चाहत्यांमध्ये चर्चा रंगते. कलाकारांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींना याबद्दल माहिती असते आणि त्या व्यक्ती अनेकदा असे धक्कादायक खुलासे करताना दिसतात. अशाच एका खाजगी महिला गुप्तहेराने केलेल्या खुलाशाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिने एका अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल सांगितलं आहे. या अभिनेत्याचे अनेक तरुण अभिनेत्रींनसोबत विवाहबाह्य संबंध होते असं ती म्हणालीये.