

bigg boss marathi 6 1st entry
esakal
गेले वर्षभर प्रेक्षक छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो शो म्हणजे कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. या शो मध्ये अभिनेते, कीर्तनकार, इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, पाहायला मिळतात. गेल्या सीझनमध्ये या शोमध्ये रीलस्टार पाहायला मिळाले होते. त्यानंतर अनेकांनी शोच्या निर्मात्यांना सुनावलं होतं. मात्र या सीझनचा विजेता एक रीलस्टार झाला. तो म्हणजे सुरज चव्हाण. सुरजने 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. आता प्रेक्षक ''बिग बॉस मराठी ६' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सीझनमध्ये असणाऱ्या एका स्पर्धकाचं नाव समोर आलंय.