Bollywood News: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा आज वाढदिवस. आज ती तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्मा ही पहिली महिला होती जिने आपल्या कुटुंबाच्या परंपरेला छेद देत सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिच्या सौंदर्य, अभिनय आणि डान्सच्या जोरावर तिने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.