अभिनय, क्रिकेट टिमच्या ओनरशिपनंतर प्रीती झिंटा आता दागिन्यांच्या व्यवसायात! लॉन्च केला नवीन लक्झरी ज्वेलरी ब्रँड

Preity Zinta Launches New Luxury Jewellery Brand: अभिनय आणि क्रिकेटनंतर प्रीती झिंटाने आता लक्झरी ज्वेलरी क्षेत्रात प्रवेश करत नवीन ब्रँड लॉन्च केला आहे.
Preity Zinta

Preity Zinta Launches New Luxury Jewellery Brand

sakal

Updated on: 

ENTERTAINMENT NEWS: तुम्ही प्रीती झिंटाला अभिनेत्री, आयपीएल टीमची सह-मालकीण किंवा बिझनेस वुमन म्हणून ओळखत असालच. आता तिने आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटनंतर प्रीतीने आता दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश केला असून 'जकार्ती ज्वेलरी' हा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे.

या ब्रँडमध्ये पारंपरिक भारतीय दागिन्यांची सुंदरता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम पाहायला मिळणार आहे. २२ कॅरेट सोनं, नैसर्गिक हिरे आणि रत्नांपासून बनवलेले हे दागिने दिसायला आकर्षक असून वापरण्यासाठीही हलके आणि आरामदायी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com