

Rashmika Mandanna
sakal
रेड कार्पेटवर कधी कधी असा एखादा लूक येतो जो साधा असूनही लगेच संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होतो. अभिनेत्री रश्मिका मंदानाने नुकत्याच ‘Cocktail 2’ च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये असाच एक लूक केला आहे, ज्यावर सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलंय. तिचा ब्लश पिंक गाऊन आणि त्याला मिळालेला नाजूक, ग्लॅमरस टच यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वळलंय. साधेपणा आणि स्टाईल यांचा परपेक्ट मेळ साधणारा हा लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.