

Rashmika Mandanna’s Mom Stuns in Traditional Kodava Saree: झगमगाट आणि ग्लॅमरच्या जगात काही क्षण असे असतात जे पारंपरिक सौंदर्य आणि संस्कृतीच्या साधेपणामुळे लक्ष वेधून घेतात. सध्या सुरु असलेल्या रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिसेप्शनमध्ये असाच एक क्षण अनुभवायला मिळाला. यावेळी रश्मिकाचा आई सुमन मंदाना नेसलेल्या आगळ्यावेगळ्या पण पारंपारिक साडीने लक्ष वेधून घेतलं. सुमन यांनी नेसलेली साडी त्यांच्या कुर्ग शैलीचा आणि सांस्कृतिक वारशाचा बरोबर ठसा उमटवत होती.
लावेंडर रंगातील साडी, साधे पण अर्थपूर्ण दागिने, आणि व्यवस्थित बांधलेला केसांचा आंबाडा, हे सर्व मिळून तयार झालेला हा लूक रिसेप्शनच्या झगमगाटातही शांत, मोहक आणि संस्मरणीय वाटत होता. चला तर मग या खास साडीचं वैशिष्ट्य जाणून घेऊया.