
Bollywood Entertainment News : बॉलिवूडबरोबरच टॉलिवूड गाजवणारी सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. आजही तिचा चाहतावर्ग मोठा आहे. श्रीदेवीने आतापर्यंत 300 हुन अधिक सिनेमांमध्ये काम केलं. तिचं प्रोफेशनल आयुष्य जितकं यशस्वी किंबहुना त्याहून जास्त तिचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिलं. मिथुन चक्रवर्तीशी झालेले कथित लग्न आणि घटस्फोट असो किंवा बोनी कपूर यांच्याबरोबरच अफेअर आणि लग्न यामुळे श्रीदेवीला टीकेचं सामना करावा लागला. पण सख्ख्या बहिणीबरोबरही श्रीदेवीचे टोकाचे वाद झाले होते.