
Bollywood News : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये असलेली धीरूभाई इंटरनॅशनल स्कुल ही शाळा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर गाजले. या शाळेत अनेक उद्योगपती, क्रीडापटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटीजची मुलं शिक्षण घेतात. या सोहळ्याला मुलांचे परफॉर्मन्स पाहायला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती.