

Aditya Kripalani expresses feelings sharing video.
Sakal
बॉलीवूड सिनेसृष्टीतून एक अत्यंत दुःखद, मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. 'मैं ॲक्टर नहीं हूँ' यांसारख्या संवेदनशील चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते आदित्य कृपालानी (Aditya Kripalani) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अत्यंत लाडक्या आणि मुलीसारख्या असलेल्या सहाय्यक दिग्दर्शिका अनुराधा पांडे (Anuradha Pandey) हिचे कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरल्याने निधन झाले आहे. या धक्क्यानंतर आदित्य कृपालानी यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.