
Bollywood News : बॉलिवूडच्या काही सिनेमांच्या दुःखी शेवटाप्रमाणे काही बॉलिवूड कलाकारांचा शेवट हा खूप वेदनादायी झाला आहे. यातील काही कलाकारांना नाही सिनेमात यश मिळालं नाही वैयक्तिक आयुष्यात. काहींना तर शेवटच्या क्षणीही यातना भोगाव्या लागल्या तर काहींना कुटूंबही जवळ नसताना मरण आलं. अशीच करुण कहाणी आहे बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता महेश आनंदची ज्याची गोष्ट वाचून तुमचं मन हेलावेल.