
Bollywood News : दमदार आवाज आणि रोमँटिक गाण्यांसाठी लोकप्रिय असलेला गायक म्हणजे अरिजित सिंह. अरिजितने कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या अरिजितने त्याच्या फॅन्सना एक खास गिफ्ट दिल आहे. अरिजितचा चांगलं काम करण्याकडे कल असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याने आता सामान्य लोकांसाठी एक हॉटेल उघडलं आहे.