Wimbledon 2024 : विम्बल्डनची क्वार्टर फायनल पाहायला पोहोचलं बॉलिवूडचं स्टार कपल ; पेस्टल ब्लु पॅन्ट-सुटमधील कियाराचा लूक चर्चेत, "हा बेस्ट अनुभव..."

Kiara Advani And Sidharth Malhotra attends Wimbeldon Quarter Final Match 2024: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी विम्बल्डन 2024 च्या क्वार्टर फायनलला हजेरी लावली.
Kiara and Sidharth at Wimbledon Quarter Final
Kiara and Sidharth at Wimbledon Quarter FinalEsakal

Sidharth Malhotra & Kiara Advani : बॉलिवूडमधील स्टार कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी एकत्र लंडनमध्ये पार पडलेली विम्बल्डनची क्वार्टर फायनल एन्जॉय केली. सोशल मीडियावर कियाराने या सुंदर क्षणाचे फोटो शेअर केले.

कियाराचा लूक

यावेळी या दोघांनीही फॉर्मल लूक केला होता. कियाराने पेस्टल ब्लु रंगाचा पॅन्ट-सूट वेअर केला होता तर सिद्धार्थने क्रीम ब्लेझर, शर्ट आणि पॅन्ट या लूकमध्ये हजेरी लावली होती. मिनिमम मेकअप, नो ज्वेलरी आणि हिल्स या लूकमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती.

Kiara and Sidharth at Wimbledon Quarter Final
Sidharth Malhotra & Kiara Advani : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केल्याचा बनाव, चाहतीकडून उकळले ५० लाख रुपये; नेमकं काय घडलं?

नवऱ्याला दिलं क्रेडिट

सोशल मीडियावर कियाराने फोटो शेअर करत पोस्ट लिहिली कि,"मला हे मान्य करायलाच हवं कि टेनिस या खेळाशी माझी ओळख नुकतीच माझ्या नवऱ्याने मला करून दिली आणि हा एक उत्तम अनुभव होता. विम्बल्डनची सेंटर कोर्टमधील लाईव्ह मॅच, स्ट्रॉबेरी आणि क्रीम याहून उत्तम अजून काय असून शकतं?"

स्टार स्पोर्ट्सने घेतली दखल

'स्टार स्पोर्ट्स' या वाहिनीनेही कियारा आणि सिद्धार्थची एक खास मुलाखत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली. यावेळी या दोघांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. कियाराने तिचा आवडता खेळाडू अल्कराज असल्याचं सांगितलं तर सिद्धार्थने त्याचा आवडता टेनिस प्लेयर अँड्री अगासी असल्याचं सांगितलं. लहानपणापासून तो त्याला फॉलो करत असल्याचं तो यावेळी म्हणाला.

सोशल मीडियावर यांच्या विम्बल्डन मधील हजेरीची चर्चा असून अनेकांनी या जोडीचं कौतुकही केलंय. ७ फेब्रुवारी २०२३ ला या दोघांनी जैसलमेरमध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मोजक्या माणसांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

Kiara and Sidharth at Wimbledon Quarter Final
Kiara - Siddharth: निळाशार समुद्र आणि ते दोघं.. कियाराने नवरा सिद्धार्थसोबत केलं वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com