

pradeep kabra
esakal
सध्याच्या कलियुगात जिथे कुणाला कुणाची पर्वा नसते, सगळे फक्त आपलाच विचार करतात, मुलं आपल्या आईवडिलांना विसरून जातात अशा जगात एक मुलगा त्याच्या आईसाठी दिवसरात्र एक करतोय. आईसाठी त्याने आपल्या करिअरला लाथ मारलीये आणि तिची सेवा करण्यात आणि तिला सांभाळण्यात आपलं सर्वस्व पणाला लावतोय. हा अभिनेता आहे बॉलिवूडचा लोकप्रिय व्हिलन प्रदीप काबरा. प्रदीपचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो आपल्या आईला पाठीवर घेऊन समुद्र किनारी चालताना दिसतोय. प्रदीप आईसाठी खऱ्या आयुष्यातला श्रावण बाळ झालाय.