
‘हेरा फेरी’ ही भारतीय सिनेमातील सर्वात लोकप्रिय विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटातील बाबू भैया (परेश रावल), राजू (अक्षय कुमार) आणि श्याम (सुनील शेट्टी) यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. गेल्या काही काळापासून ‘हेरा फेरी ३’ च्या निर्मितीची चर्चा जोरात सुरू होती. मात्र, परेश रावल या चित्रपटाचा भाग नसतील, अशी बातमी समोर आल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. पण आता खुद्द परेश रावल यांनी एका मुलाखतीत या चित्रपटात आपली पुनरागमनाची पुष्टी केली आहे.