
dilip prabhavalkar
esakal
'दशावतार' हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं. एका वेगळ्या विषयावर आधारलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यात कोकणात वेगाने घडणाऱ्या घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या. वाळू माफिया, वाढणाऱ्या इंडस्ट्री, झाडं कापून बनवण्यात आलेल्या खाणी, तिथल्या मातीचा ऱ्हास, कोकणची समृद्धी माती विकून तिथली जंगलं ओसाड बनवणारे बिल्डर हे सगळं प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात आलं. मात्र या सिनेमातून मांडण्यात आलेलं विदारक वास्तव प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंय का? या चित्रपटामुळे कोकणातल्या जमिनी वाचतील का? कोकणात अशी एखादी चळवळ उभी राहील का? यावर आता दिलीप प्रभावळकर यांनी उत्तर दिलंय.