
mahesh manjrekar
esakal
आपल्या भूमिकांसाठी कलाकार कायमच मेहनत करताना दिसतात. ती भूमिका जिवंत दिसावी म्हणून त्यावर प्रचंड काम करून मगच ते पात्र साकारण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेक कलाकार तर त्या भूमिकेत शिरण्यासाठी स्वतःचे हालदेखील करून घेतात. मात्र काही काही कलाकार इतके त्या भूमिकेत शिरतात की त्यांना ओळखणं देखील प्रेक्षकांना अशक्य होतं. याचं उदाहरण म्हणजे 'दशावतार' चित्रपट. यात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचे काही लूक इतके अचाट होते. जे पाहून प्रेक्षक त्यांना ओळखू शकले नाहीत. आता अशाच एका कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्याला जो सहजासहजी ओळखू येत नाहीये.