Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

Preity Zinta Suniel Shetty 18 Members List: सिनेमॅटोग्राफ कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून या १८ सदस्यीय मंडळाची पुनर्रचना पुढील तीन वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत करण्यात आली आहे.
Censor Board

Censor Board

esakal

Updated on

CBFC Reconstituted: केंद्र सरकारने बुधवारी (दि. १६) केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डाची फेररचना केली आहे. या १८ सदस्यीय समितीमध्ये मनोज जोशी, पल्लवी जोशी, निशिगंधा वाड, वामन केंद्रे, रमेश पतंगे या मराठी चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. तर अभिनेत्री प्रीती झिंटा, अभिनेते पंकज त्रिपाठी, सुनील शेट्टी, प्रसेनजित चॅटर्जी, चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन आणि ‘ग्रॅमी’ विजेते संगीतकार रिकी केज यांचाही समावेश करण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com