
ultra zakkas marathi
esakal
नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ रंग आणि नऊ रूपं – या अनोख्या संकल्पनेला आकार देत अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे ‘अल्ट्रा झकासची दुर्गा’ हा खास संग्रह. या विशेष निवडीतून नऊ वेगवेगळ्या मराठी चित्रपटांद्वारे नऊ ‘अद्वितीय स्त्री’ पात्रं पडद्यावर जागृत होत आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये स्त्रियांची संघर्षमय, भावनिक आणि प्रेरणादायी वाटचाल दिसते. कुणी आत्मशोधाच्या प्रवासाला निघते, कुणी समाजातील अन्यायाला आव्हान देते, कुणी नात्यांतील गुंतागुंत आणि जबाबदाऱ्यांशी झुंजते, तर कुणी प्रेम, संवेदनशीलता आणि त्यागाचं सामर्थ्य दाखवते. या कथा स्त्रीशक्तीची विविध रूपं उलगडत, प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडतात.