Chandan Shetty & Niveditha Gowda : आठ वर्ष डेटिंग आणि चार वर्षाच्या लग्नानंतर सुप्रसिद्ध जोडीने घेतला घटस्फोटाचा निर्णय

Chandan Shetty & Niveditha Gowda divorce : कन्नड इंडस्ट्रीतील स्टार कपल चंदन आणि निवेदिताने लग्नाच्या चार वर्षांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
Chandan Shetty & Niveditha Gowda : आठ वर्ष डेटिंग आणि चार वर्षाच्या लग्नानंतर सुप्रसिद्ध जोडीने घेतला घटस्फोटाचा निर्णय

Chandan & Niveditha : सोशल मीडिया स्टार असलेला अभिनेता, गायक आणि बिग बॉस कन्नड सीझन ५चा विजेता चंदन शेट्टी आणि त्याची पत्नी निवेदिता गोवडा यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी या जोडीने बंगळुरूमधील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला असून निवेदिताने तिच्या सोशल मीडिया हँडलवर ही बातमी शेअर केली.

निवेदिताची पोस्ट

घटस्फोटाची बातमी जाहीर करताना निवेदिताने पोस्टमध्ये म्हंटलं कि,"चंदन शेट्टी आणि मी आमचं नातं कायदेशीररित्या परस्पर संमतीने संपवत आहोत. आमच्या निर्णयाचा मीडिया, आमचे मित्र आणि नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या चाहत्यांना या काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची आम्ही विनंती करतो. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात आता वेगळ्या मार्गाने जात असलो तरीही आम्ही एकमेकांचा आदर करतो. या काळात तुमची तुम्ही समजून घेणं आम्हा दोघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हा सर्वांचे आभार."

तिच्या या पोस्टानंतर त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. कौटूंबिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी ते दोघेही एकत्र पोहोचले होते. त्यावेळी चंदनने निवेदिताचा हात पकडला होता. त्यामुळे त्यांना काहींनी ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला.

घटस्फोटाची बातमी जाहीर करण्याच्या फक्त एक आठवडापूर्वी या दोघांनी एका चित्रपटाच्या प्रोमोशनल कार्यक्रमासाठी एकत्र हजेरी लावली होती. अशातच अचानक या जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आलीये. ‘बिग बॉस कन्नड ५’ मध्ये जमलेली ही जोडी आता विभक्त झाली असून चार वर्षांच्या संसारानंतर चंदन व निवेदिता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय.

Chandan Shetty & Niveditha Gowda : आठ वर्ष डेटिंग आणि चार वर्षाच्या लग्नानंतर सुप्रसिद्ध जोडीने घेतला घटस्फोटाचा निर्णय
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

चंदन-निवेदिताची लव्हस्टोरी

या दोघांची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे. ते दोघे रिॲलिटी शो बिग बॉस कन्नड सीझन ५ मध्ये भेटले होते आणि शोमध्येच ते प्रेमात पडले. रिॲलिटी शोमध्ये असताना चंदनने निवेदितासाठी एक गाणं लिहिलं होतंजे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झालं होतं. यानंतर २०१९ मध्ये म्हैसूरमधील दसरा उत्सवादरम्यान चंदनने निवेदिताला लग्नाची मागणी घेतली होती, २०२० मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. लग्नावेळी निवेदिता फक्त २२ वर्षांची होती.

चंदन हा गायक, अभिनेता असून निवेदिता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. di

Chandan Shetty & Niveditha Gowda : आठ वर्ष डेटिंग आणि चार वर्षाच्या लग्नानंतर सुप्रसिद्ध जोडीने घेतला घटस्फोटाचा निर्णय
Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com