krunal pandya instagram post and Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumours
krunal pandya instagram post and Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumourssakal

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumours : सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumours : सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हार्दिकचे आडनाव काढून टाकून हा वाद निर्माण केला होता.

यानंतर आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहे. हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान पांड्याचा भाऊ कृणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

krunal pandya instagram post and Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumours
Hardik Pandya Natasa Stankovic : 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली पांड्याची पत्नी नताशा, घटस्फोटाच्या बातमीवर काय म्हणाली?

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या दोघांकडून अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. आता हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये क्रुणालने त्याचा मुलगा आणि हार्दिकच्या मुलाला आपल्या कडेवर घेतले आहे. क्रुणालच्या या पोस्टवर हार्दिकची पत्नी नताशानेही कमेंट केली आहे. नताशाने कमेंटमध्ये आनंदी इमोजी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता चाहतेही आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, रिलॅक्स मित्रांनो, घटस्फोट होत नाहीये.

krunal pandya instagram post and Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumours
Hardik Pandya : घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक पांड्या कुठे झाला गायब? टी-20 वर्ल्ड कपसाठी गेला नाही संघासोबत

2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया शनिवारी अमेरिकेला रवाना झाली. यावेळी कर्णधार रोहित शर्मासोबत अनेक खेळाडू दिसले पण संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या या खेळाडूंमध्ये नव्हता. यानंतर पांड्याच्या अनुपस्थितीबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, हार्दिक सध्या लंडनमध्ये आहे आणि तेथून तो थेट 1 जूनपर्यंत टीम इंडियामध्ये सामील होणार असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com