सुयश-आयुषीमध्ये बिनसलं ? सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो केले डिलीट अन् केलं अनफॉलो

Suyash Tilak & Aayushi Bhave : सेलिब्रिटी कपल सुयश टिळक आणि आयुषी भावेने त्यांचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट करून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा रंगली आहे.
सुयश-आयुषीमध्ये बिनसलं ? सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो केले डिलीट अन् केलं अनफॉलो

मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी कपल्सच्या जोड्या प्रेक्षकांना आवडतात. यातीलच एक लाडकी जोडी म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि त्याची बायको आयुषी भावे- टिळक. काहीच वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकलेलं हे क्युट कपल सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलंय. या जोडीच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे.

2021मध्ये सुयश आणि आयुषी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या सरप्राईज वेडींगने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला पण आता या दोघांच्याही सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर त्या दोघांनी त्यांचे एकत्र असलेले बरेच फोटोही डिलीट केले आहेत. यामुळे सध्या त्यांचे चाहते चिंतीत आहेत. इतकंच नाही तर त्या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

यामागचं नेमकं कारण त्या दोघांनी उघड केलं नसल्याने त्यांच्यात काही बिनसलं आहे का याची चर्चाही सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे. गेला बराच काळ त्यांनी एकमेकांसोबतचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीयेत.

हे पाऊल त्यांनी कोणत्या वैयक्तिक करणावरून उचललं आहे कि ते वेगळे झाले आहेत कि यामागे प्रोफेशनल कारण आहे हे अजून या दोघांनी उघड केलं नाहीये.

सुयश-आयुषीमध्ये बिनसलं ? सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो केले डिलीट अन् केलं अनफॉलो
Suyash Tilak: सुयश टिळकने तडकाफडकी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण आलं समोर...

आयुषी गेल्या काही काळापासून हिंदी मालिकांमध्ये काम करतेय. तिने आतापर्यंत दोन हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे आणि आता ती लवकरच चौथ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर सुयशसुद्धा सन मराठीवरील 'आदिशक्ती' या मालिकेत काम करत असून सोबत त्याचा फोटोग्राफीचा छंदही जोपासतो आहे. गेल्या काही काळात सुयशने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं असून त्याच्या भूमिका गाजत आहेत.

सुयश आयुषीची लव्हस्टोरी

२०२१ मध्ये सुयश आणि आयुषी पुण्यात लग्नबंधनात अडकले. त्यांनी त्यांचं रिलेशनशिप बराच काळ लपवून ठेवलं होतं. एका कार्यक्रमादरम्यान त्यांची ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

आयुषीने 'मटा श्रावण क्वीन' हा पुरस्कार जिंकला आहे याशिवाय तिने बराच काळ मॉडेलिंगसुद्धा केलं आहे. नुकतीच तिची 'नीरजा' ही हिंदी मालिका ऑफ एअर झाली. याशिवाय तिने स्टार प्लसवरील 'रज्जो' या मालिकेतही काम केलं होतं.

सुयश-आयुषीमध्ये बिनसलं ? सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो केले डिलीट अन् केलं अनफॉलो
Suyash Tilak: सुयश- आयूषीच्या नात्यात गोडवा, म्हणून झाला गोड पाडवा..

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com