

Marathi Entertainment News : नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या अॅमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नात्यांमधील समज, मतभेद, विश्वास आणि जिव्हाळा या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळतो. आधुनिक काळातील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहाणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे.