
Entertainment News : भारतीय इतिहासातील पराक्रमी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनची नवीन मालिका ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रचारासाठी ७ जून रोजी शोची टीम जयपूरहून अजमेरच्या ऐतिहासिक तारागड किल्ल्याकडे रवाना होणार आहे. या विशेष प्रसंगी शोमधील प्रमुख कलाकार रोनित रॉय आणि लहानग्या उर्वा सवालिया यांची उपस्थिती लाभणार आहे.