
Entertainment News : २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या आणि आधीपासूनच चर्चेत असलेल्या चित्रपटांमध्ये ‘चरक – फेअर ऑफ फेथ’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याच्या ठळक विषयवस्तू आणि गूढ, थरारक कथेमुळे प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द केरळा स्टोरी’सारखी ब्लॉकबस्टर देणारे सुदीप्तो सेन आता ‘सिपिंग टी सिनेमा’ या आपल्या नव्या बॅनरअंतर्गत पहिल्यांदाच निर्माता म्हणून पदार्पण करत आहेत.