
Marathi Entertainment News : झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सुरुवातीपासून लोकप्रिय आहे. पण आता गेल्या काही काळापासून ही मालिका प्रेक्षकांच्या टीकेची धनी ठरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत अक्षरा घर सोडून जाते आणि अधिपती-तिच्यामध्ये दुरावा आल्याचं कथानक दाखवण्यात येतंय. त्यातच आता अक्षराला परत आणण्यासाठी चारुहासने उचललेल्या पावलामुळे मालिकेवर टीका होतेय.