
CHETAN WADNERE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता चेतन वडनेरे याने 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतला खडूस शशांक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'लपंडाव' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतोय. तो यापूर्वी अनेक मालिकांमध्ये दिसला होता. त्याची 'फुलपाखरू' ही मालिकादेखील चांगलीच गाजली होती. तरुणाईला या मालिकेने वेड लावलं होतं. मात्र चेतनने काही वर्षांनी अचानक ही मालिका सोडली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला त्याने मालिका का सोडली याबद्दल विचारणा करण्यात आली. त्याचं कारण त्याने मुलाखतीत सांगितलंय.