

विकी कौशलचा 'छावा' सिनेमा थिएटरमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या ऐतिहासिक सिनेमाला जबरदस्त सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याला इतकी गती मिळाली की प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांतच त्याने बजेटपेक्षा जास्त कमाई केली. आता हा सिनेमा नफा तर कमावत तर आहे पण बिग बजेट सिनेमांचे रेकॉर्ड मोडत आहे. 'छावा'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी किती कमाई केली हे जाणून घेऊया.