
CHHABI
ESAKAL
कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी रहस्याची कथा असणारा ‘छबी’ हा मराठी चित्रपट गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ध्रुव छेडा, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, समीर धर्माधिकारी, जयवंत वाडकर, लीना पंडित, अनघा अतुल, संजय कुलकर्णी आणि सृष्टी बाहेकर यांसारखे दमदार कलाकार ‘छबी’मध्ये झळकणार आहेत. जया छेडा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत मसुरकर यांनी केले आहे. यात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव छेडाशी केलेली बातचीत...