
अनेक दमदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. सलग २ वर्ष त्यांनी कान्स फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'लापता लेडीज' मधील त्यांची मंजू माईची भूमिका चांगलीच गाजली. तिच्या 'ऑल वी इमॅनज अॅज लाईट' या सिनेमाचं स्क्रीनिंग कान्समध्ये झालं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत छाया यांनी त्यांचा हिंदी दिग्दर्शकाच्या सेटवर आलेला अनुभव सांगितला आहे.