CHIKIZZING MARATHI MOVIE REVIEW
Esakal
KRISHNARAJ WAINGADE PERFORMANCE IN CHIKIZZING: मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शंभरावर चित्रपटांची निर्मिती होत असली, तरी बालविश्वाचा निरागस वेध घेणारे बालचित्रपट मात्र तुलनेने कमीच पाहायला मिळतात. लहान मुलांची स्वप्ने, त्यांचा खोडकरपणा, खेळकर वृत्ती आणि कल्पनांचे अनोखे विश्व रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न ‘चिकीझिंग’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. दिग्दर्शक राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी एका चिमुकल्याच्या मोठ्या स्वप्नांची हळुवार गोष्ट यातून उलगडली आहे. परिस्थितीशी झुंज देतानाही स्वप्नांची उमेद जपणाऱ्या या बालमनाचा प्रवास भावनांना स्पर्श करणारा ठरतो.