Marathi Entertainment News : झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणुस ३"ड्रामा ज्युनियर शो मध्ये गेवराईतील गोदावरी काठावरील बालकलाकार अर्णव तौर हा झळकला असून, गेवराईच्या ग्रामीण भागात हा बारा वर्षाच्या अर्णव याच्या विनोदी भूमिकेने भुरळ घातली आहे..गेवराई (जि.बीड) गोदावरी काठावरील गोपत पिंपळगावचा रहिवाशी तथा हल्ली मुक्काम पुणे येथील अर्णव दिलीप तौर (वय १२) या चिमुकल्या कलाकाराने या अगोदर झी मराठीवरील ड्रामा जूनियर्स हा शो आपल्या अभिनयाने गाजवला आहे. तसेच आता तो देव माणूस - ३ (मधला अध्याय) मध्ये रितिक या विनोदी भूमिकेत आपली कला सादर करत आहे. देवमाणूस ३ च्या सेट वर सुद्धा तो आपल्या हरहुन्नरी व हजर जबाबीपणामुळे, अतिशय मेहनतीने आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केल्यामुळे तो सर्व कलाकारांच्या गळ्यातला ताईत बनला आहे..गोदाकाठचा बालकलाकार अर्णव तौर या बारा वर्षे चिमुकल्याने विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवले असून प्रेक्षकांमध्ये विनोदी भूमिकेमुळे लोकप्रियता वाढली आहे. अर्णवला बाल वयापासूनच अभिनय, वाचन, कला क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत आला आहे. त्याला अभिनय क्षेत्रात मोठा कलाकार होऊन कला क्षेत्रात मराठवाड्याचे नाव मोठं करायच आहे. त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असल्याचं त्याने या अगोदर मुलाखतीत सांगितलं आहे. .मराठवाड्यातील ग्रामीण भागातुन हा छोटा कलाकार रुपेरी पडद्यावर झळकत असल्याने गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित, माजी जिव्हा परिषद सदस्य अण्णासाहेब तौर, माजी जिल्हा परिषद सदस्य सतिश पवार,अँड. दिलीप तौर, सरपंच अरुण तौर, सरपंच उमेश तौर, उध्दव तौर, गोपाल चव्हाण,माजी सरपंच सुदाम आर्दड, योगेश तौर, यांच्यासह गेवराईतील ग्रामीण भागात कौतुकाचा वर्षाव होत आहे..देवमाणूस मधला अध्याय ही मालिका सध्या चर्चेत आहे. किरण गायकवाडने साकारलेला डॉक्टर अजितकुमार सगळ्यांना आवडतो आहे..प्रेम नाही तर या कारणासाठी आशुतोष यांनी केलं रेणुकाशी लग्न ? अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा,"माझी आई..".सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.