'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Harshali Malhotra passed SSC with good marks : हर्षाली मल्होत्राने दहावीत उत्तम गुण मिळवत सगळ्यांचं मन जिंकलं.
Harshali Malhotra
Harshali MalhotraEsakal

'बजरंगी भाईजान' या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली मुन्नी म्हणजेच अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिचे डान्स रील्स कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकतंच तिने दहावी सुद्धा उत्तम गुणांनी पास केली. तिच्या डान्स रील्सला काहीजण ट्रोलही करतात. यावरून दुखावलेल्या हर्षालीने सोशल मीडियावर रील शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.

काही दिवसांपूर्वीच हर्षालीने हिरामंडी वेबसिरीजमधील गाण्यावर सुंदर डान्स रील शेअर केलं. अनेकांनी तिच्या डान्स रीलचं कौतुक केलं. तर काहींनी तिला ट्रोल केलं. तर या आधीच्याही डान्स रील्सवर तिला ट्रोल करण्यात आलं होतं. “बोर्डचे पेपर आहेत, अभ्यास कर. रील बनवून परीक्षेत पास होता येत नाही. कथ्थक क्लासला जातेस आणि रील बनवतेस”, “संपूर्ण दिवस रीलचं बनवतं असतेस का? अभ्यास करतेस की नाही?” "दहावीचा अभ्यास कर नाहीतर नापास होशील" अशा अनेक कमेंट्स ट्रोलर्सनी तिच्या रील्सवर केल्या होत्या. यावर हर्षालीने एक रील शेअर करत ट्रोलर्सची बोलती बंद केली.

तिने काल एक व्हिडीओ शेअर केला या व्हिडिओमध्ये तिने तिला आलेले ट्रोल्स हायलाईट केले आणि तिला दहावीत 83% मिळाल्याचं जाहीर केलं. तिने तिच्या कृतीतून ट्रोलर्सची बोलती बंद केली. सीबीएसई बोर्डातून हर्षालीने दहावीची परीक्षा दिली.

तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं.

दरम्यान, तिने शेअर केलेलं हिरामंडी वेबसिरीजमधील 'एक बार देख लीजिए' गाण्यावरील तिचा डान्स सगळ्यांना आवडला. हर्षालीच्या डान्स रीलने आणि एक्सप्रेशनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिच्या या व्हिडीओला ८ मिलियन व्ह्यूज असून ३ लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.

तर तिने शेअर केलेली कत्थकची अदाकारीही सगळ्यांना पसंत पडली. तर जब सैय्यान या गाण्यावरील डान्स सुद्धा व्हायरल झाला होता. आता हर्षाली सिनेमामध्ये कधी कमबॅक करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Harshali Malhotra
Salman Khan Firing Case: फक्त सलमान खानच नाही, तर इतर दोन प्रसिद्ध अभिनेतेही होते बिश्नोई गँगच्या रडारवर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com