Samir Choughule: "तुझ्या विना माझे सतत..."; बायकोच्या वाढदिवसानिमत्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

Maharashtrachi Hasyajatra Actor Samir Choughule: समीर चौघुले हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. नुकतीच त्यांनी बायकोसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
 Samir Choughule
Samir Choughulesakal

Samir Choughule Share Post For Wife: छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील अभिनेते समीर चौघुले (Samir Choughule) हे त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. समीर चौघुले हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. नुकतीच त्यांनी बायकोसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

समीर चौघुले यांची पोस्ट

पत्नी कविता चौघुले यांच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुले यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. समीर यांनी कविता यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "कविता चौघुले, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तू माझ्या आयुष्यात आहेस,याबद्दल मी तुझे आभार मानतो, तुझ्या विना माझं सतत अडणं असच कायम राहू दे....खूप प्रेम तुला"

 Samir Choughule
Samir Choughule: "नैराश्याने भरलेल्या जीवनात नकळतपणे...", चाहत्याच्या घराच्या भिंतीवर फोटो बघताच समीर भावूक

समीर चौघुले यांनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला, तसेच अनेकांनी पोस्टला कमेंट करुन कविता चौघुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

समीर हे अनेकवेळा पत्नी कविता चौघुले यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.

समीर चौघुले यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच त्यांनी विकुन टाक, चंद्रमुखी, मुंबई टाइम्,कायद्याच बोल, आजचा दिवस माझा या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी आंबट गोड,सारे तुझ्याच साठी या मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

 Samir Choughule
Samir Choughule: आम्ही शोकसभेचं स्कीट केलं आणि... समीर चौगुलेंनी सांगितला भन्नाट किस्सा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com