
MYRA VAIKUL
ESAKAL
छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री मायरा वायकुळ मोठ्या पडद्यावर देखील झळकलीये. तिने 'देवाचं घर' या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केली होती. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील तिच्या सोज्वळ रूपावर सगळेच फिदा झाले. मात्र खऱ्या आयुष्यात इतक्या कमी वयात लोकप्रियता मिळाल्याने ती मोठ्या माणसांसारखी वागायला लागली आहे. ती मुलाखतींमध्येही अगदी समजूतदार माणसासारखी उत्तरं देते. त्यावर ती या आधीही ट्रोल झालीये. आता तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती तिच्या मैत्रीणीबद्दल बोलतेय. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावलाय.