
Marathi Entertainment News : मराठी बरोबरच हिंदी इंडस्ट्रीमध्येही नाव कमावणारा अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. अभिनयाबरोबरच उत्तम लेखक अशी ओळख असलेल्या चिन्मयने आजवर अनेक मालिकांचं लेखन केलं आहे. त्यातीलच त्याची एक गाजलेली मालिका म्हणजे एका लग्नाची दुसरी गोष्ट. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका असलेली मालिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. पण तुम्हाला माहितीये का ? या मालिकेतील एक किस्सा चिन्मयच्या आयुष्यात खरोखर घडला होता.