

CHINAMYEE SUMEET
ESAKAL
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत तिच्या बिनधास्त वागण्यासाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिचे विचार बिनधास्तपणे मांडताना दिसते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर अगदी मुद्देसूद बोलताना दिसते. अनेकदा तिची मतं ही मतभेद निर्माण करणारी असतात. ती आपल्या भाषणांमधून सामाजिक विषयांवर बोलताना दिसते. ती तिच्या भाषणांची सुरुवात नेहमी जयभीम बोलून करते. त्यामुळे ती नेमकी कोणत्या धर्माची आहे असा प्रश्नही तिला विचारला जातो. आता तिने एका कार्यक्रमात तिच्या जय भीम बोलण्यामागचा अर्थ सांगितला.