
natya karandak
esakal
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव 'नाट्य परिषद करंडक' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये संपन्न झाली. दिनांक २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध १९ केंद्रांवर प्राथमिक फेरी घेण्यात आली. यातील निवडक २५ एकांकिकेची अंतिम फेरी दिनांक १५, १६, १७ व १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 'नाट्यशृंगार, पुणे' या संस्थेची 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय' ही एकांकिका प्रथम आली.