Ajanta Verul Film Festival 2025 : सिनेमा हा अखेर प्रेक्षकांसाठीच असतो! ख्यातनाम दिग्दर्शिका सई परांजपे
Sai Paranjpye : पद्मभूषण सई परांजपे यांनी अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान सिनेमा केवळ प्रेक्षकांसाठी असतो, असे सांगितले. त्यांनी मराठवाड्यातील तरुणाईला सिनेमा साक्षर करणारे या महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी ५० हून अधिक मराठी चित्रपट तयार होतात. काही यशस्वी होतात, काही तांत्रिकदृष्ट्या कच्चे असतात पण मनाला भिडतात. काहींना चित्रपट महोत्सवात स्थान मिळते, काही डबाबंद होतात, पण सिनेमा हा अखेर प्रेक्षकांचा असतो.