
गेल्या वर्षभरात छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यातील काही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरल्या. तर काही मालिका प्रेक्षकांवर खास प्रभाव पाडू शकल्या नाहीत. मालिकांचा टीआरपी चांगला असेल तर त्या वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. मात्र टीआरपी चांगला नसेल तर निर्माते मालिका डब्बाबंद करण्याचा निर्णय घेतात. चांगला मालिकांचा टीआरपी चांगला नसल्याने अशाच काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता अशीच एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.